Salman KhanTeam Lokshahi
मनोरंजन
Salman Khan : अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याच्या धमकीचा फोन
अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या धमकीच्या फोननंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सोमवारी रात्री एका व्यक्तीने मुंबई पोलीस कंट्रोलला फोन केला आणि सलमानला मारण्याची धमकी दिली.
धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:चं नाव रॉकी भाई असल्याची माहिती मिळत आहे. फोन करणाऱ्या रॉकी भाईने पोलीस कंट्रोलला सांगितलं की तो जोधपूरचा राहणारा आहे आणि तो एक गोरक्षक आहे. असे सांगितले जात आहे. या आधीच लॉरेन्स बिष्णोई कडून आलेल्या धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेत करण्यात आली आहे.