Vijay Deverakonda Car Accident
Vijay Deverakonda Car Accident

Vijay Deverakonda Car Accident : अभिनेता विजय देवरकोंडाच्या कारचा अपघात, पोस्ट शेअर करत म्हणाला...

हैदराबादहून परतताना त्याच्या गाडीचा अपघात झाला
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • अभिनेता विजय देवरकोंडाच्या कारचा अपघात

  • हैदराबादहून परतताना त्याच्या गाडीचा अपघात झाला

  • विजयच्या कारला बोलरो गाडीने धडक दिली

(Vijay Deverakonda Car Accident) अभिनेता विजय देवरकोंडाच्या कारचा अपघात झाला आहे. अभिनेता विजय देवरकोंडा व रश्मिका मंदाना यांच्या साखरपुड्याच्या चर्चा रंगल्या असतानाच आता त्याच्या अपघाताची बातमी आल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

तेलंगणामधील जोगुलंबा गडवाल जिल्ह्याजवळ विजय देवरकोंडाचा अपघात झाला. विजय देवरकोंडा आपल्या मित्रांसोबत पुट्टपती येथे गेला होता. हैदराबादला परतताना त्याच्या गाडीचा अपघात झाला. विजयच्या कारला एक बोलरो गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

या अपघातात विजयच्या कारच्या पुढच्या बाजूला धडक बसल्याने नुकसान झाले. मात्र, कारमध्ये असलेल्या कोणत्याही व्यक्तीला काहीही दुखापत झाली नाही. अपघातानंतर विजय देवरकोंडाने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना अपघाताबद्दल माहिती दिली आहे.

विजय देवरकोंडा म्हणाला की, 'सर्व ठीक आहे, गाडीचा अपघात झाला, पण आम्ही सर्व ठीक आहोत. स्ट्रेंथ वर्कआउट केला आणि आत्ताच घरी परतलो. माझं डोकं दुखत आहे, पण बिर्याणी आणि झोप काहीही बरे करु शकणार नाही अशी कोणतीही गोष्ट नाही. तुम्हा सर्वांना खूप प्रेम. बातम्यांमुळे तुम्हाला ताण येऊ देऊ नका.' अशी पोस्ट विजय देवरकोंडाने केली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com