शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण

शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण

Published by :
Published on

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहेत आणि नियमवाली सुद्धा शिथिल करण्यात आले असले तरी कोरोना अजून पूर्णपणे संपलेला नाही. तसेच अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती तीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

दिवाळी सण म्हटल कि खरेदी आलीच यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जाते आणि यामुळे कोरोनाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहेत. दरम्यान उर्मिला मातोंडकर यांनाही कोविडची सौम्य लक्षणे जाणवली, त्यानंतर त्यांनी कोविड चाचणी केली आणि त्यांचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर त्यांनी स्वतःला क्वारंटाइन केलेल आहे. संपर्कात आलेल्या लोकांना त्यांनी आवाहन केले आहे की दिवाळी सणासुदीत लोकांनी विशेष काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.

शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला पक्षाच्या अनेक कार्यक्रमांत जात असे. तसेच काहीवेळा तर लोकांच्यामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने जावे लागत. दरम्यान आज चाचणीनंतर कोरोना पॉझिटिव्ह असा रिपोर्ट आल्याने उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com