Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळेची नवी पोस्ट चर्चेत; वाद निर्माण होण्याची शक्यता

Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळेची नवी पोस्ट चर्चेत; वाद निर्माण होण्याची शक्यता

अभिनेत्री केतकी चितळे हिने शनिवारी सायंकाळी एक फेसबुक पोस्ट केली आहे. तिने एक फोटो शेअर करत परिधान केलेल्या जुन्या दागिन्यांची ओळख करुन दिली आहे.
Published by :
Team Lokshahi

अभिनेत्री केतकी चितळे हिने शनिवारी सायंकाळी एक फेसबुक पोस्ट केली आहे. तिने एक फोटो शेअर करत परिधान केलेल्या जुन्या दागिन्यांची ओळख करुन दिली आहे. त्याबरोबरच जुनी श्रीमंती, मायनॉरिटीचा आणि गुणवत्तेचा मुद्दा तिने उपस्थित केलाय. या पोस्टमुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो. सध्या आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना केतकीने ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तर मुद्दा उपस्थित केला आहे. या पोस्टमध्ये तिने समान नागरी कायद्याचा हॅशटॅग दिला.

१५० वर्ष (जास्तच पण कमी नाही): नथ

७०-८० वर्ष (जास्तच पण कमी नाही): कुड्या

६०-७० वर्ष (जास्तच पण कमी नाही): तन्मणी

५०-६० वर्ष (जास्तच पण कमी नाही): बांगड्या

आम्ही नवश्रीमंत नाही, त्यामुळे पैशाचा माज नाही.

आम्ही २०० वर्षापूर्वी जसे जगत होतो ( आजच्या भाषेत लाईफस्टाईल) तसेच आजही जगतो, त्यामुळे २०० वर्ष आणि आज यातील फरक दिसत नाहीत. स्वातंत्र्यापूर वी किंवा नंतर आमच्या बाजूने कायदा कधीच नव्हता, त्यामुळे त्याचे कौतुक नाही.

खरी मायनॉरिटी असून आम्हाला फुकट सुखसुविधा नको, त्यामुळे आम्ही भिकारी नाही.

६०० वर्षापूर्वी ही ब्राह्मण हा क्षत्रिय बनत होता आणि आजही बनतो आहे, त्यामुळे तुमच्या आरोपांची कदर नाही. शिकायची उपजत गोडी असल्याने आम्हाला खरा इतिहास माहिती आहे, त्यामुळे आम्हाला गप्प करणे शक्य नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com