Lara Dutta : अभिनेत्री लारा दत्ताला कोरोनाची लागण, मुंबई महापालिकेनं घर केलं सील
कोरोना( Covid 19) विषाणूच्या लाटेचा प्रभाव भारतामध्ये कमी झाला आहे. पण अजूनही भारतात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात जगभरात विविध देशांमध्ये चौथ्या लाटेनं धडक दिल्याचं बोललं जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. त्याचवेळी, आता बॉलिवूडमधून कोरोना विषाणूचे एक ताजे प्रकरण समोर आले आहे. बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) हिला कोरोनाची लागण झाली आहे.
मात्र नुकतंच अभिनेत्री लारा दत्ताला (Lara Dutta) कोरोनाची लागण झाली. मुंबई महानगरपालिकेनं (BMC) तिचं घर सील केलं असून तिच्या घराचा परिसर हा 'मायक्रो कंटेन्मेंट झोन' ( Micro-Containment Zone) म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सुदैवाने लारा दत्ताच्या कुटुंबातील इतर कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नाही. दरम्यान, लारा दत्ताकडून अद्याप कोणतीही माहिती याबाबत देण्यात आलेली नाही.