Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्रावर दु:खाचा डोंगर ; जवळच्या व्यक्तीला गमावलं
बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राच्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांचे काका आणि अभिनेत्री मन्नारा चोप्राचे वडिलांचे रमण राय हांडा यांचे निधन झाले. वयाच्या 72 व्य वर्षी 16 जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.काही दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून ठीक न्हवती. रमण राय हांडा हे उच्च न्यायालयामध्ये वकील होते अभिनेत्री मन्नारा चोप्रा ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट लिहित ही माहिती सांगितली आहे.
"अत्यंत दुःखद अंतकरणाने माझ्या वडिलांच्या निधनाची बातमी देत आहोत 16 जून 2025 रोजी ते आम्हाला सोडून गेले ते आमच्या कुटुंबासाठी मोठा आधार होते", अशा शब्दात अभिनेत्री मन्नारा चोप्राने दुःख व्यक्त केले. रमण हांडा यांच्या पार्थिवावर 18 जून रोजी दुपारी एक वाजता मुंबई मधील अंधेरी पश्चिम येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होतील अशी माहिती ही तिने दिली. रमण राय हांडा यांच्या मागे त्यांची पत्नी कामिनी चोप्रा हांडा आणि मुलगी मिताली,मन्नारा असा त्यांचा परिवार आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा भावुक
यावेळी प्रियंका चोप्राने पण याबाबत इंस्टाग्रामवर काकांबरोबरच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. "तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात राहाल काका तुमच्या आत्म्याला शांती लाभो", अशा आशयाची तिने पोस्ट शेअर केली आहे 16 जून रोजी प्रियंकाची आई मधु चोप्रा यांचा वाढदिवस होता. त्याच दिवशी प्रियंकाच्या काकाचे निधन झाले या बातमीने संपूर्ण चोप्रा कुटुंब दुःखात आहे. जेव्हा जेव्हा मनारा चोप्राला तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी मिळाली तेव्हा ती तात्काळ मुंबईला परत आली.