मनोरंजन
तुमची लाडकी ‘शनाया’ अडकली लग्नबंधनात
काहीच दिवसांपूर्वी 'शनाया', अर्थातंच रसिका सुनीलने आपण लग्न करत असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.
आपल्या अभिनयाने थोड्याच वेळात प्रेक्षकांच्या मनात घर करणारी रसिका अखेर १८ ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकली आहे. नवरदेव आदित्य बिलागीने हा फोटो शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.
हा विवाह सोहोळा गोव्यात थोडक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

