Rupali Bhosale : अभिनेत्री रुपाली भोसलेच्या कारचा भीषण अपघात
(Rupali Bhosale) अभिनेत्री रुपाली भोसलेच्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने अभिनेत्रीला काहीही इजा झालेली नाही, परंतु तिच्या नव्याने खरेदी केलेल्या लक्झरी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
काही महिन्यांपूर्वीच रुपालीनं तिची मर्सिडिज बेन्झ गाडी खरेदी केली होती. या नवीन कारचा अपघात झाल्याची माहिती तिनं स्वतः सोशल मीडियावरुन दिली. रुपालीनं इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत “Accident झाला, वाईट दिवस” असे लिहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात गाडीच्या बोनेटला मोठा डेन्ट आला आहे, तसेच समोरचा भागही डॅमेज झालेला दिसतो. मात्र हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. तरीही चाहत्यांनी रुपालीला सोशल मीडियावरून धीर दिला आहे.
रुपाली भोसले ही ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. सध्या ती ‘लंपडाव’ या मालिकेत सरकार या खलनायिकेच्या भूमिकेत झळकत आहे. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असलेली रुपाली तिच्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते.