Tejaswini Lonari Engagement
Tejaswini Lonari Engagement

Tejaswini Lonari Engagement : अभिनेत्री तेजस्विनी लोणारी होणार 'या' राजकीय कुटुंबाची सून; थाटामाटात पार पडला साखरपुडा, फोटो आले समोर

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Tejaswini Lonari Engagement) गेल्या काही महिन्यांमध्ये मराठीसह हिंदी कलाविश्वातील बरेच कलाकार लग्नबंधनात अडकले. यातच अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा पार पडला असून शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या थोरल्या मुलासोबत तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा पार पडला.

समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचा साखरपुडा झाला. थाटामाटात हा साखरपुडा पार पडला असून या साखरपुड्याचे फोटो आता समोर आले आहेत. मुंबईतील सेंट रेगीस या पंचतारांकित हॉटेलमध्ये खासगी लोकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा समारंभ पार पडला.

तेजस्विनी लोणारी अभिनयाने प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आहे. अनेक मालिकांमधून काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. यासोबतच अनेक मराठी सिनेमांमध्ये देखील तेजस्विनी लोणारीने काम केलं आहे. साखरपुड्याला तेजस्विनीने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. या प्रसंगी अनेक राजकीय नेते आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार उपस्थित होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com