‘आदिपुरुष’ महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही - राम कदम

‘आदिपुरुष’ महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही - राम कदम

सैफ अली खानचा विक्रम वेधा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याचवेळी त्याच्या आदिपुरुष या चित्रपटाचा टीझर चर्चेत आहे. या चित्रपटातील तिचा लूक खूप ट्रोल होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

सैफ अली खानचा विक्रम वेधा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याचवेळी त्याच्या आदिपुरुष या चित्रपटाचा टीझर चर्चेत आहे. या चित्रपटातील तिचा लूक खूप ट्रोल होत आहे. काही नेटकऱ्यांनी या कलाकारांच्या लूकबद्दलही खिल्ली उडवली आहे. तर काहींनी या चित्रपटाच्या व्हीएफएक्सबाबत टीका केली आहे. राजकीय वर्तुळातूनसुध्दा आता यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपा नेते राम कदम यांनी या चित्रपटाला विरोध करत म्हणाले आहेत की, ‘आदिपुरुष’ हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

राम कदम यांनी सोशल मिडियावर ट्विट करत म्हणाले की, आदिपुरुष हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. या चित्रपटात निर्मात्यांनी पुन्हा एका किरकोळ प्रसिद्धीसाठी आमच्या देवी देवतांचं विडंबन करुन कोट्यवधी हिंदू लोकांच्या श्रद्धा आणि आस्थेला ठेच पोहोचवली आहे. आता वेळ आली आहे… या विडंबनाचा फक्त माफीनामा.”

यासोबतच अजून एक ट्विट करत ते म्हणाले की, “दृश्यांची काटछाट करून चालणार नाही. अशी घाणेरडी विचारधारणा असलेल्या लोकांना धडा शिकवायलाच हवा. अशाप्रकारच्या कोणत्याही चित्रपटावर कायमची बंदी किंवा संबंधित लोकांनी इंडस्ट्रीत काम करण्यावर काही वर्ष बंदी घालण्यात यावी. जेणेकरून भविष्यात कोणीही पुन्हा असं करण्याची हिंमत करणार नाही. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही.”असा इशारा त्यांनी दिला आहे.

‘आदिपुरुष’ महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही - राम कदम
‘आदिपुरुष’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com