‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावे झळकणार ‘या’ संगीतमय चित्रपटात! शूटिंगलाही सुरुवात !

‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावे झळकणार ‘या’ संगीतमय चित्रपटात! शूटिंगलाही सुरुवात !

गेल्या वर्षी सुबोध भावे दिग्दर्शित ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाला ७ वर्ष पूर्ण झाली. गेल्या वर्षी सुबोध भावेने गेल्या वर्षी आगामी चित्रपटाची घोषणा केली होती.
Published by :
Team Lokshahi

सात वर्षांपूर्वी म्हणजे २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कट्यार काळजात घुसली' या सांगीतिक सिनेमाचं दिग्दर्शन सुबोध भावेनं केलं होतं. या सिनेमाला नुकतीच सात वर्षं पूर्ण झाली. यानिमित्तानं एक पोस्ट शेअर करत सुबोधनं आगामी एका सांगीतिक सिनेमाबद्दल सांगितलं होतं. चित्रपट 'मानापमान' द्वारे भव्यदिव्य संगीतमय नजराणा सादर करण्यास सज्ज झाला आहे.

गेल्या वर्षी सुबोध भावे दिग्दर्शित ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाला ७ वर्ष पूर्ण झाली. गेल्या वर्षी सुबोध भावेने गेल्या वर्षी आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. त्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगितीक नजराणा मिळणार आहे. नुकताच त्या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला असून चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली.

सर्वात आधी ‘कट्यार काळजात घुसली’, ‘मी वसंतराव’नंतर आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुबोधच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘मानापमान’ असं आहे. नुकताच ‘मानापमान’ या चित्रपटाचा मुहूर्त पुण्यातल्या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इंस्टीट्यूटच्या कॅम्पसमध्ये पार पडला, त्यावेळेचे काही फोटो सुबोधने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मानापमान' चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याच्या वेळी आपलं मनोगत एका व्हिडिओद्वारे शेअर करतं सुबोध भावे म्हणाला की, माझ्या अत्यंत आवडत्या जागी जिथं मला प्रचंड ऊर्जा मिळते, जिथं येऊन आयुष्यात चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते ती जागा म्हणजेच FTI पुणे इथं कट्यार काळजात घुसली, आणि डॅा. काशिनाथ घाणेकर आणि माझ्या एका वेबसीरिजचा मुहूर्त ही इथंच ह्या झाडाखाली पार पडला होता. आणि आज माझ्या आगामी चित्रपट 'मानापमान' चा मुहूर्त देखील इथंच होतो आहे.

सुबोध भावेनं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या "मानापमान " या आगामी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. जितेंद्र जोशी, समीर चौघुले, सायली संजीव, सुयश टिळक, ऋतुजा बागवे या कलाकारांनी सुबोधच्या पोस्टला कमेंट करुन त्याच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com