Ranbir kapoor, Alia Bhatt, Katrina Kaif
Ranbir kapoor, Alia Bhatt, Katrina KaifTeam Lokshahi

रणबीर आलियाच्या लग्नानंतर आता आणखी एक नवा खुलासा समोर...

एक नवा खुलासा समोर आला आहे, आणि तो खुलासा केला आहे अभिनेता इम्रान हाश्मी याने.
Published by :
Saurabh Gondhali

नुकताच बॉलीवूड सिनेसृष्टीमधील मोठा विवाह सोहळा पार पडला. हा विवाह अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) व अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) या दोघांचा होता. हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. नुकताच त्यांच्या कुटुंबासह हा विवाह सोहळा पार पडला. आलिया भट तिच्या मेकअपमुळे तसेच तिच्या साडी व तिच्या सेंडल मुळे सोशल मीडियावर चर्चा झाली. परंतु नुकताच एक नवा खुलासा समोर आला आहे, आणि तो खुलासा केला आहे अभिनेता इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) याने.

आता हे आपल्या सर्वांनाच माहितीय की आलियाच्या आधी काही वर्ष रणबीर कतरिना कैफ (Katrina Kaif) ला डेट करत होता. दोघे काही वर्ष लीव्हइन मध्ये देखील राहत होते. याच दरम्यान कतरिना कैफला आलिया भट्टच्या चुलत भावानं म्हणजेच अभिनेता इमरान हाश्मीनं (Emraan Hashmi) एक सल्ला दिला होता. त्यानं कतरिनाला रणबीरला सोडून देण्याचा सल्ला दिला होता. हो आज अनेक वर्षांनी या गोष्टीचा उलगडा झाला आहे.

इम्रान हाश्मीनं करण जोहरच्या सेलिब्रिटी चॅट शो (Celebrity chat show) मध्ये याविषयी सांगितले होते. करण जोहरने त्याला तेव्हा विचारलं होतं की,''तो रणबीर-कतरिनाला काय सल्ला देईल?'' त्यावंर इमराननं रणबीर कपूरला सल्ला दिला होता की,''तो मुलींशी खेळणं बंद करे'', आणि कतरिनाला सल्ला दिला होता की, ''तिनं रणबीर कपूरला सोडून द्यायला हवं.

आता रणबीर-आलियाचं लग्न झालं आहे त्यामुळे जुन्या गोष्टी उकरुन काढण्यात काहीच अर्थ नाही. पण इमरान हाश्मिचं नाव रणबीर-कतरिनाच्या ब्रेकअपशी जोडलं गेल्यानं उगाचच चर्चा होतेय. असो,आता लग्नानंतर आलिया-रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा प्रदर्शित होतोय,ज्या माध्यमातून ते प्रथमच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या सिनेमात मौनी रॉय देखील महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तर आलिया सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये आणि कतरिना तिच्या 'मेरी ख्रिसमस'च्या शूटिंग मध्ये बिझी आहे,

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com