अजय देवगणचा 'भोला' चित्रपटातील पहिला लूक आला समोर

अजय देवगणचा 'भोला' चित्रपटातील पहिला लूक आला समोर

बॉलीवूड इंडस्ट्रीचा अॅक्शन स्टार अजय देवगण सध्या त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'दृश्यम 2'मुळे चर्चेत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

बॉलीवूड इंडस्ट्रीचा अॅक्शन स्टार अजय देवगण सध्या त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'दृश्यम 2'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्याचवेळी तो त्याच्या आगामी 'भोला' या चित्रपटातून धमाका करणार आहे. अजय देवगणने त्याच्या चित्रपटातील त्याचा पहिला लूक त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे.

'भोला' चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. अजय देवगणने त्याच्या 'भोला' चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. त्याने चार वेगवेगळ्या अँगलमधून चित्रपटातून आपला लूक दाखवला आहे. यासोबतच अजय देवगणने एक छोटीशी क्लिप शेअर केली आहे. या क्लिकमध्ये त्याचा लूक दिसत आहेत.

तब्बू अजय देवगणसोबत 'भोला' चित्रपटात दिसणार आहे. या दोन्ही स्टार्सचा हा 9 वा चित्रपट आहे. अजय देवगणचा चित्रपट 'भोला' हा तमिळ चित्रपट 'कैथी'चा रिमेक आहे. अजय देवगण या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com