अक्षय कुमारने 'OMG 2' सिनेमासाठी घेतला नाही एकही रुपया

अक्षय कुमारने 'OMG 2' सिनेमासाठी घेतला नाही एकही रुपया

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या 'ओएमजी 2' (OMG 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमारच्या 'ओएमजी 2' या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम दिसत आहे.
Published by  :
shweta walge

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या 'ओएमजी 2' (OMG 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमारच्या 'ओएमजी 2' या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम दिसत आहे. दरम्यान खिलाडी कुमारने 'ओएमजी 2' या सिनेमासाठी मानधन घेतलं नसल्याचं निर्माते अजित अंधारे यांनी सांगितलं आहे.

'ओएमजी 2' या सिनेमाचे निर्माते अजित अंधारे पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, अक्षय कुमारने 'ओएमजी 2' या सिनेमासाठी एकही रुपया घेतलेला नाही. उलट या सिनेमाच्या आर्थिक गोष्टींसाठी अभिनेत्याने मदत केली आहे. अक्षय आणि आमचं खूप चांगलं नातं आहे. 'ओएमजी'सह 'स्पेशल 26' आणि 'टॉयलेट : एक प्रेम कथा' या सिनेमासाठीही अक्षयचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे चांगलं कथानक असेल तर खिलाडी कुमारचा आम्ही सर्वात आधी विचार करतो.

अक्षय कुमारने 'OMG 2' सिनेमासाठी घेतला नाही एकही रुपया
Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचा बोल्ड लूक, पाहा फोटो...

अजित पंधारे पुढे म्हणाले,"ओएमजी 2' या सिनेमाच्या बजेटबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. या सिनेमाचं बजेट 150 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे पण हे खोटं आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागाची फक्त 25 कोटींमध्ये निर्मिती करण्यात आली होती". अक्षयने या सिनेमासाठी 35 कोटी रुपये माधन घेतल्याचं म्हटलं जात होतं. पण आता निर्मात्यांनी अभिनेत्याने एकही रुपये न घेतल्याचा दावा केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com