अक्षय कुमारला मिळाले भारतीय नागरिकत्व, म्हणाला- 'हृदय आणि नागरिकत्व दोन्ही भारतीय'
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या 'OMG 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, अक्षय कुमारबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अक्षय कुमारला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.
अक्षय कुमारने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. विशेष म्हणजे, अक्षय कुमारकडे भारतीय नागरिकत्व नाही आणि तो भारतातून करोडो रुपये कमावतो या कारणावरून अक्षय कुमारला खूप ट्रोल करण्यात आले होते. अक्षय कुमारकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे.
अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर हँडलवर हा डॉक्युमेंट शेअर केला आहे. यासोबत अक्षय कुमारने लिहिले आहे की, 'दिल आणि नागरिकत्व, दोन्ही हिंदुस्थानी. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. जय हिंद.' यासोबतच भारताच्या तिरंग्याची इमोजी बनवण्यात आली आहे. अक्षय कुमारच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत त्याचे अभिनंदन केले आहे.