Jaya bachchan On Akshay kumar : "तुम्ही स्वत: चित्रपट पहा" जया बच्चनच्या टिप्पणीवर अक्षय कुमारची प्रतिक्रिया

Jaya bachchan On Akshay kumar : "तुम्ही स्वत: चित्रपट पहा" जया बच्चनच्या टिप्पणीवर अक्षय कुमारची प्रतिक्रिया

जया बच्चनच्या टीकेवर अक्षय कुमारची प्रतिक्रिया: 'टॉयलेट: एक प्रेम कथा' पाहा आणि मग बोला
Published by :
Team Lokshahi
Published on

अक्षय कुमार नेहमीच सामाजिक संदेश देणारे चित्रपट करतो. 2017 मध्ये त्याने 'टॉयलेट: एक प्रेम कथा' हा चित्रपट केला होता. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर या दोघांनी मुख्य भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी जया बच्चन यांनी या चित्रपटावर टीका केली होती. टीका करताना त्या म्हणाल्या की, "मी असे चित्रपट कधीच पाहायला जाणार नाही", या टीकेवर आता अक्षय कुमारने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'केसरी2' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपट संदर्भात त्याने पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळेस अक्षय कुमारने या मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले. त्यावर अभिनेता म्हणाला की, "मला वाटत नाही की कोणीही या चित्रपटांवर टीका केली पाहिजे. अशा चित्रपटांवर टीका करणारा मुर्खच असेल, तुम्ही स्वत: चित्रपट पहा, मी 'पॅडमॅन', 'एअरलिफ्ट', 'टॉयलेट एक प्रेम कथा', 'केसरी' बनवले आहेत. आता मी 'केसरी चॅप्टर2' हा चित्रपट करत आहे. मी असे अनेक चित्रपट बनवले आहेत. मला वाटत नाही की, कोणीही त्यांच्यावर टीका केली असेल.

अक्षय कुमार याला भूतकाळात केलेल्या टीकाबद्दल विचारले असता, अक्षय म्हणाला की, "त्या बोलत असतील तर 'टॉयलेट एक प्रेम कथा' हा चित्रपट करुन मी चूक केली आहे. ते बरोबर आहे.

केसरी चॅप्टर2 चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

अक्षय कुमार याचा आगामी केसरी चॅप्टर2 हा चित्रपट 18 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक करण सिंह त्यागी यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com