पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी आलिया भट्टला लागला डोळा, फोटो होतोय तूफान व्हायरल

पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी आलिया भट्टला लागला डोळा, फोटो होतोय तूफान व्हायरल

काल [14 ऑक्टोबर] देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एनएमएसीसीच्या 141 व्या आयओसी सत्राचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला राजकीय मंडळींसह अनेक बाॅलिवूड स्टारही उपस्थित होते.
Published by :
shweta walge

काल [14 ऑक्टोबर] देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एनएमएसीसीच्या 141 व्या आयओसी सत्राचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला राजकीय मंडळींसह अनेक बाॅलिवूड स्टारही उपस्थित होते. या उद्घाटनानंतर नरेंद्र मोदी यांचे एक भाषण देखील झाले. या आयओसी सत्राचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

या कार्यक्रमात शाहरुख खान, दीपिका पादुकोण, रणबीर कपूर आणि आलियी भट्ट हे देखील उपस्थित होते. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण हे एकमेकांच्या शेजारी बसल्याचे दिसले तर दुसरीकडे मागच्या लाईनमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दोघे दिसत आहेत. यावेळचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

चक्क या फोटोमध्ये आलिया भट्ट ही झोपलेली दिसत आहे. धक्कादायक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असतानाच आलिया भट्ट ही थेट झोप काढताना दिसतंय. यामुळे हा फोटो पाहून सर्वजण हैराण झाले. या फोटोमुळे आलिया भट्ट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे दिसत आहे. अनेकांनी आलियाची खिल्ली देखील उडवलीये. लोक तिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत.

पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी आलिया भट्टला लागला डोळा, फोटो होतोय तूफान व्हायरल
Navratri Health Tips : तुम्ही नवरात्रीचे व्रत करत असाल तर चुकूनही या 4 चुका करू नका! आरोग्याची हानी होईल.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com