Alia BhattTeam lokshahi
मनोरंजन
Alia Bhatt : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्यानंतर आलिया भट्टने स्वत:ला भेट दिली नवीन लक्झरी कार; किंमत ऐकून थक्क व्हाल...
गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी आलिया भट्टला नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आलियाने स्वतःसाठी लक्झरी कार खरेदी करून आनंद साजरा केल्याचे दिसत आहे.
आपल्या दशकभराच्या कारकिर्दीत आलिया भट्टने अनेक भन्नाट परफॉर्मन्स दिले आहेत. नुकताच या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला. आपल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी अभिनेत्रीने स्वतःला लक्झरी कारची ट्रीट दिली आहे.
आलियाने भट्टच्या नव्या गाडीचा व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ या पापाराझी पेजवरून शेअर करण्यात आला आहे. अभिनेत्रीने रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी लाँग व्हीलबेस (LWB) गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत जवळपास ३ कोटी ८१ लाख एवढी आहे. आलियाच्या या नव्या गाडीचे फोटो-व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.