रात्र तुरुंगात काढल्यानंतर अखेर अल्लू अर्जुनची जेलमधून सुटका
अल्लू अर्जुन, 'पुष्पा-2' या चित्रपटातील सुपरस्टार अल्लू अर्जुन याची जेलमधून सुटका झाली आहे. रात्र तुरुंगात काढल्यानंतर सकाळी तुरुंगातून बाहेर आला आहे. ‘पुष्पा 2- द रुल’ या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली होती.
अल्लू अर्जूनचे वडील आणि सासरे त्याला घेण्यासाठी हैदराबादच्या चंचलगुडा सेंट्रल जेलमध्ये पोहोचले आहेत. अल्लू अर्जुनला कालच या प्रकरणात जामीन मिळाला होता, मात्र त्यानंतरही त्याला तुरुंगातच रात्र काढावी लागली. काल अटक केल्यानंतर रात्री उशिरा त्याची सुटका होऊ शकली नाही.
अल्लू अर्जुनला शुक्रवारी सकाळी संध्यामहालयात झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या घटनेत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा ८ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी अल्लू अर्जुनला हैदराबादमधील त्याच्या राहत्या घरातून अटक करून चेंगराचेंगरी प्रकरणाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये अटक केली होती.