‘इरफान’च्या आठवणीत भावुक, बिग बींनी लिहलेले पत्र वाचून डोळ्यातले अश्रू रोखता येणार नाही

‘इरफान’च्या आठवणीत भावुक, बिग बींनी लिहलेले पत्र वाचून डोळ्यातले अश्रू रोखता येणार नाही

Published by :
Published on

बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांनी जगाचा निरोप घेऊन २ वर्षं उलटली आहेत. मात्र अद्यापही त्याची आठवण येऊन डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. दरम्यान आता तर बॉलिवूडचा अँग्री मॅन, शहनशहा बिग बीचं भावूक झाल्याचे दिसत आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी थेट इरफानच्या मुलाला पत्र लिहून आपले मनमोकळे केले आहे. बिग बींनी (Amitabh Bachchan) लिहलेले पत्र वाचून डोळ्यातले अश्रू रोखता येणार नाहीत.

इरफान खाननं (Irrfan Khan) २९ एप्रिलला जगाचा निरोप घेतला,या घटनेला आता २ वर्षं होतील. मात्र या दोन वर्षात मुलगा बाबिल आणि पत्नी सुतापा सिकदर नेहमीच सोशल मीडियावर इरफानच्या (Irrfan Khan) आठवणी शेअर केल्या आहेत. आता बिग बी यांनी बाबिलला एक इमोशनल पत्र लिहिलं आहे.

बिग बींच संपुर्ण पत्र

बिग बींनी (Amitabh Bachchan) लिहितात, 'प्रिय बाबिल, तू केलेल्या आठवणीबद्दल धन्यवाद. जीवन क्षणिक आहे आणि मृत्यू अमर. पण मैत्री ही मृत्यूपेक्षा वरचढ आहे. श्रेष्ठ आहे. जे मागे सोडून गेलं, ते कायम आठवणीत आहे. ते विसरणं अशक्य आहे. दर वेळी एखादा वाक्प्रचार, विनोद एखादी कृती यातून जवळच्या व्यक्तीची आठवण करून दिली जाते. यामुळेच मृत्यूनंतरही आपण त्या व्यक्तीच्या जवळ राहतो. तुझे वडील खूप चांगला माणूस होते. त्यांनी त्यांचं आयुष्य ज्यांच्याबरोबर घालवलं, त्या सगळ्यांना त्यांना जाणून घ्यायची संधी मिळाली. त्यांची खूप आठवण येते.' बिग बींनी (Amitabh Bachchan) शेवटी इरफानची (Irrfan Khan) पत्नी सुतापा आणि छोटा मुलगा अयानचेही आभार मानले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com