अमोल कोल्हेंनी कलाकार म्हणून नथुरामाची भूमिका केली, शरद पवारांकडून कोल्हेंची पाठराखण

अमोल कोल्हेंनी कलाकार म्हणून नथुरामाची भूमिका केली, शरद पवारांकडून कोल्हेंची पाठराखण

Published by :

मराठी अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe)  यांच्या व्हाय आय किल्ड गांधी (Why I killed Gandhi)  या सिनेमात त्यांनी नथुराम गोडसे (Nathuram Godse)  यांची भूमिका साकारल्याने चांगलाच वाद उफाळून आला. यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांसह अनेकांनी कोल्हे यांचा निषेध केला आहे. अशात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र अमोल कोल्हे यांना थेट समर्थन दिलं आहे.

गांधी सिनेमा सगळ्या जगात गाजला. त्या सिनेमात सुद्धा नथुराम गोडसेची भूमिका होती. नथुराम गोडसेची भूमिका केली तो कलाकार होता. कलाकार म्हणून कोल्हेंच्या या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे, असं पवार म्हणाले. विशेष म्हणजे कोल्हे यांच्या या चित्रपटाचा मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

दरम्यान आज यावर शरद पवार यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत जो औरंगजेबाची भूमिका करतो. त्यात तो मुघलांचा समर्थक होत नाही, किंवा राम -रावणाच्या भूमिकेत रावणाची भूमिका करणाऱ्याने सीतेचं अपहरण केलं असं होत नाही, असं ते म्हणाले.

अमोल कोल्हेंनी जी भूमिका केली ती कलावंत म्हणून केली, मला माहिती आहे, अमोल कोल्हे यांनी ज्यावेळी भूमिका केली, त्यावेळी ते आमच्या पक्षातही केली, त्यांनी कलावंत म्हणून भूमिका केली म्हणजे त्यांनी गांधींविरोधात भूमिका आहे असा त्याचा अर्थ नाही. किंवा नथुराम गोडसेने जे काय काम केलं, त्याबद्दल सारा देश जाणून आहे, असं पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com