अनिल कपूरचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक? अभिनेत्याच्या पोस्ट गायब

अनिल कपूरचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक? अभिनेत्याच्या पोस्ट गायब

अनिल कपूरच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्याने अलीकडेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत.
Published by :
Team Lokshahi

बॉलिवूडचा सदाबहार अभिनेता अनिल कपूरबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असलेल्या या अभिनेत्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सर्व पोस्ट आणि फोटो डिलीट केले आहेत. मात्र, या सर्व पोस्ट खुद्द अभिनेत्यानेच डिलीट केल्या आहेत किंवा त्याचं अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अनिल कपूरचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक?

अभिनेता अनिल कपूर आपल्या चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. अनेकदा अभिनेता त्याचे फोटो आणि जिमचे व्हिडिओ देखील चाहत्यांसोबत शेअर करतो. पण आता त्याच्या अकाऊंटवरून सर्व व्हिडिओ आणि फोटो डिलीट करण्यात आले आहेत.

आता त्याची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूरनेही चाहत्यांसोबत प्रतिक्रिया दिली आहे. सोनमने अभिनेत्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलचा स्क्रीनशॉट स्टोरीला शेअर करत लिहिले, डेडा??'

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com