अनुष्का शर्माचा मोठा निर्णय; ‘या’ प्रॉडक्शन हाऊसची साथ सोडणार

अनुष्का शर्माचा मोठा निर्णय; ‘या’ प्रॉडक्शन हाऊसची साथ सोडणार

Published by :
Team Lokshahi
Published on

अनुष्का शर्माची (Anushka Sharma) एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियाद्वारे जाहीर केले आहे की ती स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस (Production house) सोडत आहे. त्यांनी स्थापन केलेले हे प्रॉडक्शन हाऊस आता पूर्णपणे भाऊ कर्णेश शर्मा (Karnesh Sharma) सांभाळणार आहे. अनुष्काने तिचा भाऊ कर्णेशसोबत 2013 मध्ये हे प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते.

अनुष्काने तिच्या भावासोबत क्लीन स्लेट फिल्म्सच्या (slate films) बॅनरअंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. अनुष्का तिच्या भावासह प्रॉडक्शन हाऊस खूप दिवसांपासून सांभाळत होती, पण आता तिला फक्त अभिनयावर लक्ष केंद्रित करायचे आहे. जवळपास तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत असताना अनुष्काने हा निर्णय घेतला आहे.

आपल्या सोशल पोस्टमध्ये अनुष्का म्हणतेय, "जेव्हा माझा भाऊ कर्णेश शर्मा आणि मी क्लीन स्लेट फिल्म्स सुरू केली, तेव्हा आमचा एकमेव अजेंडा होता प्रेक्षकांचे मनोरंजन करणे. आज या प्रवासात मागे वळून पाहिलं तर आपण केलेल्या आणि साध्य केलेल्या कामाचा मला अभिमान वाटतो. एक आई म्हणून मी व्यवसायाने अभिनेत्री होण्यासाठी निवडले आहे, मला माझे जीवन नवीन फॅशनशी संतुलित करावे लागेल जे मी यापूर्वी कधीही केले नव्हते.

अनुष्का शर्मा शेवटची झिरो (zero) चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता ती क्रिकेटपटू झुलन गोस्वामीवर (Jhulan Goswami) बनत असलेल्या 'चकदा एक्सप्रेस' या चित्रपटातून जवळपास तीन वर्षांनी चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे. अनुष्काला एक वर्षाची मुलगी असून, तिला तिच्या मुलीच्या संगोपन आणि अभिनयाकडे पूर्ण लक्ष द्यायचे आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com