Anushka Sharma: फायनलचा थरार बघायला आलेल्या अनुष्का शर्माच्या ड्रेसची चर्चा; तुम्हालाही परवडेल इतका स्वस्त

Anushka Sharma: फायनलचा थरार बघायला आलेल्या अनुष्का शर्माच्या ड्रेसची चर्चा; तुम्हालाही परवडेल इतका स्वस्त

काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा विश्वचषक सामना पार पडला. या विश्वचषकाच्या सामन्यात टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने हजेरी लावली होती.
Published by  :
shweta walge

काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा विश्वचषक सामना पार पडला. या विश्वचषकाच्या सामन्यात टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने हजेरी लावली होती. सोशल मीडियावर सध्या तिचे फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या सामन्यादरम्यान अनुष्काने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण या सामन्यादरम्यान अनुष्काने परिधान केलेला ड्रेस फारच स्वस्त आहे.

अनुष्काने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये हॉल्टर नेकलाइनची वैशिष्ट्याची सुंदर प्रिंट आहे. निळ्या आणि पांढऱ्या फ्लोरल प्रिन्ट वाल्या या ड्रेसमध्ये अनुष्का खूपच कंफर्टेबल आणि स्टाइलिश दिसत होती. साईड पॉकेट्समुळे या ड्रेसला एक वेगळाच लूक आला होता. तिच्या या फ्लोरल ड्रेसन अनेकांचं लक्ष वेधलं आहे. अनेकांना या ड्रेसची किंमत किती आहे हे जाणून घेण्याचीही उत्सुकता लागली आहे.

विराट कोहलीची पत्नी तसेच बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या अनुष्काने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत कोणालाही परवडेल अशी आहे.विश्वचषक फायनलसाठी अनुष्काने परिधान केलेला पोशाख निकोबारच्या स्वदेशी लेबलचा आहे तर याची किंमत ७,२५० रुपये इतकी आहे.

Anushka Sharma: फायनलचा थरार बघायला आलेल्या अनुष्का शर्माच्या ड्रेसची चर्चा; तुम्हालाही परवडेल इतका स्वस्त
Ind vs Aus WC Final 2023 LIVE Score; बुमराहने ऑस्ट्रेलियाला दिला तिसरा धक्का, ऑस्ट्रेलिया 47 धावा 3 बाद

दरम्यान, वर्ल्ड कप 2023'चा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडला. या सामन्यात भारताचा पराभव झाला. फायनल मॅच दरम्यान अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. विराट कोहलीची पत्नी अनुष्काही हा सामना पाहायला आली होती. त्यावेळी तिने टीम इंडियाला (Team India) पाठिंबा दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com