Anushka Sharma Post On Virat Kohli HBD: विराटच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काची खास पोस्ट

Anushka Sharma Post On Virat Kohli HBD: विराटच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काची खास पोस्ट

विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त त्याला एका खास व्यक्तीकडून खास पोस्टद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. अनुष्का शर्मा जी विराट कोहलीची पत्नी आहे.
Published on

विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकारांकडून, क्रिकेटपटूनकडून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. विराट कोहली आज 36व्या वर्षाचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला एका खास व्यक्तीकडून खास पोस्टद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. अनुष्का शर्मा जी विराट कोहलीची पत्नी आहे. दरवर्षी अनुष्का विराटच्या वाढदिवसानिमित्त काही ना काही पोस्ट करते. यावेळी देखील तिने एक खास पोस्ट केली ज्यात अकाय आणि वामिका हे दोघे देखील विराट कोहलीसह पाहायला मिळत आहे. विराट कोहली अन् त्याची दोन मुल मज्जामस्ती करताना त्या फोटोतून दिसत आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दोघे 11 डिसेंबर 2017 रोजी इटली येथील टस्कनी येथे लग्नबंधनात अडकले. यानंतर ११ जानेवारी २०२१ ला त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले तिचे नाव वामिका ठेवले. नंतर तीन वर्षांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी मुलगा अकाय झाला. मात्र अनुष्काने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com