A R Rahman
A R RahmanTeam Lokshahi

A R Rahman : रहमानच्या मुलीचं म्युझिकल 'वेडिंग रिसेप्शन'; 'या' सेलिब्रिटींची उपस्थिती

काही दिवसांपुर्वी भारतीय संगीतकार ए आर रहमान यांच्या मुलीचं खतिजाा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला आहे.
Published by :
shamal ghanekar
Published on

काही दिवसांपुर्वी भारतीय संगीतकार ए आर रहमान ( A R Rahman) यांची कन्या खतिजाचे लग्न सोहळा थाटामाटात पार पडला आहे. रहमान यांची मुलगी खतीजाचं गेल्या महिन्यात ऑडिओ इंजिनियर रियासुद्दीन बरोबर लग्नबंधनात (Khatija Wedding) अडकली होती. त्यानिमित्ताने रहमान यांनी काल चेन्नईमध्ये ग्रँड पार्टीचं आयोजन केले होते.

या ग्रँड पार्टीला टॉलीवूड, बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. या ग्रँड पार्टीचे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या पार्टीमध्ये रहमान यांच्या मित्रांनी उपस्थिती लावली होती. चाहत्यांनी हे फोटो पाहून रहमान यांच्या मुलीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

चेन्नईमध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजित करण्यात आले होते. या पार्टीमध्ये अनेक प्रसिद्ध संगीतकार आणि गायकांनी लाईव्ह परफॉर्मन्स दिला आहे. या पार्टीमध्ये गायक उदित नारायण, सोनू निगम, हनी सिंग, मिका सिंग आणि संगीतकार शिवमणि और जतिन पंडित तसेच प्रसिद्ध गीतकार गुलजार हेही उपस्थित होते. यावेळी रिसेप्शन पार्टीमध्ये अभिनेत्री मनीषा कोईराला, साहिल खान, संदीप सिंग, फिल्ममेकर मणिरत्नम, शेखर कपूर याशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांचाही समावेश आहे.

या पार्टीचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच हनी सिंगने या पार्टीमधील काही खास क्षणाचे फोटो त्याच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि 'या नवदांपत्याला लग्नाच्या खुप शुभेच्छा दिल्या आहेत.

A R Rahman
“माझ्यावरील सर्व आरोप खोटे” हनी सिंगने अखेर सोडलं मौन…
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com