Arijit Singh
ARIJIT SINGH QUITS PLAYBACK SINGING: FANS SHOCKED BY SUDDEN ANNOUNCEMENT

Arijit Singh : प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहचा पार्श्वगायनातून अचानक ब्रेक; चाहत्यांना मोठा धक्का

Playback Singing: प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह यांनी प्लेबॅक सिंगिंगमधून ब्रेक जाहीर केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे
Published by :
Dhanshree Shintre
Published on

भारतीय संगीतजगतील सुपरस्टार अरिजीत सिंह यांनी प्लेबॅक सिंगिंग सोडण्याची धक्कादायक घोषणा केली. त्यांच्या जादुई आवाजाने कोट्यवधी हृदयं जिंकलेल्या या गायकाने एक्स (ट्विटर) वर पोस्ट करून सांगितले की, ते आता नव्या चित्रपटांसाठी गाणी रेकॉर्ड करणार नाहीत. मात्र, संगीताची दुनिया सोडणार नाहीत आणि स्वतंत्र संगीत व प्रोजेक्ट्सवर काम करत राहतील.

अरिजीत यांनी पोस्टमध्ये लिहिले, "नव्या वर्षाच्या शुभेच्छा. इतकी वर्षे श्रोत्यांच्या रूपात मला प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. मी आनंदित होऊन घोषणा करतो की, मी प्लेबॅक सिंगर म्हणून नवीन असाइनमेंट्स घेणार नाही. हा शानदार प्रवास होता, ईश्वराने कृपा केली." त्यांनी स्वतःला 'छोटा कलाकार' म्हणत भविष्यात संगीत जवळून शिकण्याची इच्छा व्यक्त केली. पाईपलाइनमधील जुने प्रोजेक्ट्स पूर्ण करणार असल्याने यंदाच काही गाणी ऐकायला मिळतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com