Arijit Singh Live Concert
Arijit Singh Live Concert

Arijit Singh Live Concert : निवृत्तीनंतर अरिजीत सिंहचा जोरदार Comeback ; कोलकात्यात चाहत्यांची भावूक भेट

बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंग काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आला होता. पार्श्वगायनातून थांबण्याचा संकेत दिल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
Published by :
Riddhi Vanne
Published on

बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंग काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आला होता. पार्श्वगायनातून थांबण्याचा संकेत दिल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, ही नाराजी फार काळ टिकली नाही. अवघ्या काही दिवसांतच अरिजीतने रंगमंचावरून जोरदार कमबॅक करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे

रविवारी रात्री कोलकात्यात झालेल्या खास कार्यक्रमात अरिजीत सिंगने लाईव्ह परफॉर्मन्स केला. नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या अनुष्का शंकर यांच्या ‘चॅप्टर टूर २०२६’मध्ये तो विशेष पाहुणा म्हणून सहभागी झाला. अरिजीत स्टेजवर येताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कार्यक्रमातील क्षणांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

या शोमध्ये अरिजीतने अनुष्का शंकर आणि तबलावादक बिक्रम घोष यांच्यासोबत काही निवडक रचना सादर केल्या. बंगाली संगीताची झलक आणि आधुनिक अंदाज यांचा मिलाफ प्रेक्षकांना भावला. सुमारे वीस मिनिटांच्या या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमानंतर अरिजीतने अनुष्का शंकरच्या घरी झालेल्या भेटीचा उल्लेख करत, दोघेही एका नव्या गाण्यावर एकत्र काम करत असल्याचं सांगितलं. त्यामुळे लवकरच चाहत्यांना काहीतरी खास ऐकायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अरिजीतच्या या पुनरागमनामुळे त्याच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू फुललं आहे.

थोडक्यात

  1. अरिजीत सिंग, बॉलिवूडचा लोकप्रिय गायक, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चर्चेत आला.

  2. पार्श्वगायनातून थांबण्याचा संकेत दिल्याने चाहत्यांना धक्का बसला.

  3. ही नाराजी फार काळ टिकली नाही.

  4. काही दिवसांतच अरिजीतने रंगमंचावर जोरदार कमबॅक केला.

  5. चाहत्यांना आनंदाचा धक्का मिळाला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com