Asha Bhosle :  फिल्म इंडस्ट्रीचा सर्व इतिहास फक्त मला माहिती, मी काहीही विसरलेली नाही...

Asha Bhosle : फिल्म इंडस्ट्रीचा सर्व इतिहास फक्त मला माहिती, मी काहीही विसरलेली नाही...

बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये गाणी गात आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणाऱ्या आशा भोसले.
Published on

बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये गाणी गात आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणाऱ्या आशा भोसले. आशा भोसलेंनी त्यांच्या गाण्यांने बॉलिवूड गाजवलं. आशा भोसले आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आल्या आहेत.

८ सप्टेंबर रोजी आशा भोसले यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने दुबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात खुद्द आशा भोसले गाणार आहेत. एका पत्रकार परिषदमध्ये बोलत असताना आशा भोसले असं काही बोलल्या आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

आशा भोसले म्हणाल्या की, फिल्म इंडस्ट्रीचा इतिहास फक्त मला माहिती आहे. अनेक गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी मी सांगत बसली तर तीन – चार दिवस लागतील.. दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, गायकांबद्दल मला सर्व काही माहिती आहे. अनेक गोष्टी आजही माझ्या मनात आहेत. मी काहीही विसरलेली नाही. मला सर्व माहिती आहे. मी इंडस्ट्रीमधील शेवटची मुघल आहे. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com