दिल से सोल्जर, दिमाग से शैतान हैं हम...; 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा दमदार टीझर रिलीज

दिल से सोल्जर, दिमाग से शैतान हैं हम...; 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा दमदार टीझर रिलीज

अ‍ॅक्शन पॅक्ड एंटरटेनर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ ही पॉवर जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

Bade Miyan Chote Miyan Teaser : अ‍ॅक्शन पॅक्ड एंटरटेनर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ ही पॉवर जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असून सर्वजण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच, या चित्रपटाचा रोमांचक टीझर रिलीज केला आहे.

'बडे मियाँ छोटे मियाँ' चा टीझर रिलीज झाला असून संपूर्ण अॅक्शन आणि कॉमेडीने परिपूर्ण आहे. टीझरची सुरुवात खलनायकाचा आवाजाने होते. यानंतर अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची धमाकेदार एन्ट्री आहे. या दोघांनीही चित्रपटात आर्मी ऑफिसर्सची भूमिका साकारली आहे. त्यानंतर टायगर श्रॉफ 'दिल से सैनिक, मन से शैतान हैं हम', त्यानंतर येतो अक्षय 'बचके रहना हम से, हिंदुस्तान हैं हम!', असे म्हणताना दिसत आहे. या टीझरमध्ये अनेक धमाकेदार अ‍ॅक्शन सीक्वेन्सही पाहायला मिळतात.

टीझर रिलीज करण्यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. एप्रिल 2024 मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ व्यतिरिक्त चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचे तर पृथ्वीराज सुकुमारन यांनी 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. सोनाक्षी सिन्हा, अलाया एफ, रोनित रॉय आणि मानुषी छिल्लर यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com