Bigg Boss Marathi 6 : 'आम्ही काय इथे हात लावायला आलोय का?' अनुश्रीच्या आरोपावर सागरचं तिखट उत्तर, रुचिताने घातला वादात भर
‘बिग बॉस मराठी’च्या घरात पुन्हा एकदा वादळ उठलं आहे. यावेळी कारण ठरलं बेडवरून झालेलं भांडण. अनुश्री राकेश बापटच्या जागेवर झोपल्याने दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. राकेश आजारी असल्याने त्याने शांतपणे जागा सोडण्याची विनंती केली, पण ती ऐकली गेली नाही. अखेर त्याने तिला उठवलं आणि तिथूनच वादाला सुरुवात झाली.
पुढच्या दिवशी अनुश्रीने वेगळाच मुद्दा काढत आरोप केल्याने घरात मोठी चर्चा रंगली. यावर सागर कारंडे संतापलेला दिसला. त्याने थेट अनुश्रीला समज देत, हा विषय चुकीच्या दिशेने नेला जात असल्याचं स्पष्ट केलं आणि राकेशची बाजू घेतली.
सागरने सांगितलं की, अस्वस्थ वाटत असेल तर त्याच क्षणी बोलायला हवं होतं. उशिरा आरोप केल्याने गैरसमज वाढतात. दरम्यान, रुचिता जामदारने पुन्हा भूमिका ठाम ठेवत वाद आणखी पेटवला. एकूणच, घरातला हा प्रकार प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला असून पुढे काय घडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात
बिग बॉस मराठी घरात पुन्हा वादळ
वादाचे कारण: बेडवरून भांडण
अनुश्रीने राकेश बापटच्या जागेवर झोप घेतली
राकेश आजारी असल्याने शांतपणे जागा सोडण्याची विनंती केली.
विनंती न ऐकली गेल्यामुळे वाद निर्माण
अखेर राकेशने तिला जागेवरून उठवले, ज्यामुळे वादाला सुरुवात झाली.

