'बिग बॉस मराठी'चा ५ व्या सीझन लवकरच येणार भेटीला; 'हा' मराठमोळा अभिनेता करणार होस्टिंग

'बिग बॉस मराठी'चा ५ व्या सीझन लवकरच येणार भेटीला; 'हा' मराठमोळा अभिनेता करणार होस्टिंग

'बिग बॉस मराठी'च्या ५ व्या सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

'बिग बॉस मराठी'च्या ५ व्या सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेळी बिग बॉस मराठीचे होस्टिंग बॅालीवूडचा स्टार, प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर “बिग बॉस मराठी” चा व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे.

या नव्या सिझनचे हे नवे सरप्राईज असणार असून या सिझनमध्ये एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. हिंदीमधल्या अफाट यशानंतर 'बिग बॉस' हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. “बिग बॉस मराठी”चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला.

बिग बॉस मराठी” च्या पहिल्या चार सिझनने मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकली आणि मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जोरदार चर्चा झाली. आता त्याच 'बिग बॅास' मराठीच्या नव्या सिझनची जोरात तयारी सुरू झालीय. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये बिग बॅासच्या या घरात आणखी काय काय नाविन्य असेल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com