बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या चित्रपटांमध्ये नेहमीच चर्चेत असलेला बघायला मिळतो. मात्र आता तो त्याच्या कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे, शाहरुख आणि त्याचे कुटुंब मन्नत सोडणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. शाहरुख त्याच्या कुटुंबाबरोबरच लवकरच वांद्रे येथील एका आलीशान घरामध्ये शिफ्ट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या घरामध्ये तो दोन वर्ष राहणार असून या घराचे भाडं 24 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात मन्नत घराची डागडुजी करण्यात येणार आहे. या घरामध्ये मोठे बदल करण्यात येणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून मन्नतमध्ये रिनोव्हेशन होणार असल्याचे बोलले जात होते. तसेच आता या घरावर अजून दोन मजलेदेखील वाढवणार आहेत. गौरी खानने महाराष्ट्र कोस्टल झोनकडून मॅनेजमेंट अथॉरिटीकडून परवानगीदेखील मिळाली आहे.
शाहरुख खानचे कुटुंब 6 मजली मन्नतच्या केवळ 2 मजल्यांमध्ये राहते. उर्वरित मजले कार्यालये, खाजगी बार, खाजगी थिएटर, स्विमिंग पूल, अतिथी कक्ष, जिम, लायब्ररी, खेळाचे क्षेत्र आणि पार्किंग यासारख्या इतर सुविधांसाठी वापरले जातात. मन्नतमध्ये पाच लक्झरी बेडरूम्स, मल्टिपल लिव्हिंग एरिया आणि डायनिंग एरिया आहेत. आकाशाच्या दिशेने, मागे आणि बाजूंना. मन्नतच्या प्रत्येक मजल्यावरून समुद्राचे सुंदर दृश्य दिसते.
सध्या तो पूजा कासा अपार्टमेंटमध्ये राहायला जाणार आहे. हे घर चित्रपट निर्माते वासू भगनानी यांचे आहे. या घराचा करार जॅकी भगनानी आणि रेड चिलीज प्रोडक्शन कंपनीमध्ये झाला आहे. यामध्ये शाहरुख खान, त्याचे कुटुंब आणि त्यांच्याबरोबर त्याची सुरक्षा टीम आणि स्टाफदेखील राहणार आहे.