'या' अभिनेत्री आणि तिच्या वडिलांवर का आली एवढे फ्लॅटस विकण्याची वेळ

'या' अभिनेत्री आणि तिच्या वडिलांवर का आली एवढे फ्लॅटस विकण्याची वेळ

नुकताच बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींनी मुंबईतील चार फ्लॅटस विकले आहेत. या चारही फ्लॅटस अंधेरीच्या ग्रीन एकर्स परिसरातील आहेत. यामुळे बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींची सर्वत्र चर्चा होत आहे.
Published by :
Team Lokshahi

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर निर्माते बोनी कपूर त्यांच्या दोन्ही मुलींचा सांभाळ करत आहेत. श्रीदेवी यांच्या निधनांतर अभिनेत्री जान्हवी कपूर आणि तिची लहान बहीण खुशी कपूर यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. सध्या निर्माते बोनी कपूर आणि त्यांच्या दोन्ही मुली चर्चेत आहेत. याचे कारणही तसेच आहे. नुकताच बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींनी मुंबईतील चार फ्लॅटस विकले आहेत. या चारही फ्लॅटस अंधेरीच्या ग्रीन एकर्स परिसरातील आहेत. यामुळे बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींची सर्वत्र चर्चा होत आहे.

एका रिपोर्टनुसार, बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींनी सर्व फ्लॅटस १२ कोटींपेक्षा अधिक रूपयांना विकल्याची माहिती समोर येत आहे. माहितीनुसार, सर्वात मोठा फ्लॅट १८७० स्क्वेअर फूट होता. तर, बोनी कपूर आणि त्यांच्या मुलींनी अंजू नारायण आणि सिद्धार्थ नारायण यांना हा फ्लॅट विकल्याची माहिती समोर येत आहे.

लवकरच जान्हवी कपूर ज्युनिअर एनटीआरसोबत आगामी तेलूगू चित्रपट देवरा १ आणि टायगर श्रॉफसोबत बडे मियां छोटे मियांमध्ये दिसेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com