बॉलिवूड अभिनेत्री युविका चौधरी पोलिसांच्या ताब्यात

बॉलिवूड अभिनेत्री युविका चौधरी पोलिसांच्या ताब्यात

Published by :

बॉलिवूड अभिनेत्री युविका चौधरीला अनुसूचित जातीबाबत टिप्पणी आणि अपमानास्पद वक्तव्याबाबत प्रकरणी हरियाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ३ तास हरियाणा पोलीस युविकाची चौकशी केली.

तिने काही काळापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात तिने एक जातीवादी हा शब्द वापरला होता. त्यानंतर तिच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. एवढेच नाही तर तिला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले होते. मात्र, आता तिला जातीय शब्द वापरल्याप्रकरणी सोमवारी अटक करण्यात आली आहे.

यावर्षी मे महिन्यात युविका चौधरीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तिच्या विरोधात ट्विटरवर युविका चौधरीला अटक करा ही मागणी ट्रेंड करत होती. लोकांनी युविकाकडे माफी मागण्याची मागणी घातली होती. प्रकरण वाढताच युविकानेही माफी मागितली होती. युविकाने एका ट्विटमध्ये लिहिले की, तिला या शब्दाचा अर्थ माहित नव्हता आणि यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ती माफी मागते.

युविका चौधरी बिग बॉस 9 या शोमुळे चर्चेत आली. याच शोमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. बिग बॉस सिझन 9 मध्ये युविका प्रिन्स नरूला या अभिनेत्याला भेटली. त्यादोघांच्या या शोमधील केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. युविका प्रिन्स सोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com