सलमान खान च्या ‘अंतिम’ सिनेमाचा ट्रेलर आऊट

सलमान खान च्या ‘अंतिम’ सिनेमाचा ट्रेलर आऊट

Published by :

मुंबई | अभिनेता सलमान खानच्या 'अंतिम- द फायनल ट्रुथ' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमातील सलमानच्या फर्स्ट लूक पासूनच या सिनेमाची चर्चा होती. अखेर सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आहे.

यात सलमान खान एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून आयुष शर्मा गॅंगस्टरच्या भूमिकेत आहे. सलमान खान फिल्मसची ही निर्मिती असून महेश मांजरेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. यात अनेक मराठी कलाकारही पाहायला मिळत आहेत.सयाजी शिंदे, सचिन खेडेकर, उमेश जगताप हे मराठमोळे चेहरे ट्रेलर मध्ये दिसत आहेत. सलमान खान ने देखील ट्विटद्वारे अंतिम सिनेमा ट्रेलर शेअर केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com