ब्रह्मास्त्र | रणबीर, आलियाचा चित्रपट लवकरच सिनेमागृहात

ब्रह्मास्त्र | रणबीर, आलियाचा चित्रपट लवकरच सिनेमागृहात

Published by :
Team Lokshahi

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचे चाहते 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. खूप दिवसापासून या चित्रपटाची शूटिंग सुरु होती. काही दिवसापूर्वी रणवीर आणि आलिया वाराणसीच्या (Varanasi) रस्त्यांवर शूटिंग करताना दिसले होते. नुकतेच ह्या चित्रपटाच्या निर्माता करण जौहर (Karan Johar) ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने सांगितले की, ब्रह्मास्त्र चित्रपटाचे शूटिंग संपले आहे.

करण जौहरने पोस्ट शेअर करत लिहीले की,

आश्चर्यकारक, रोमांचक, कठोर परिश्रम, समर्पण, प्रेम आणि उत्कटतेने भरलेला प्रवास शेवटी संपला. तुमच्यासाठी घेऊन येत आहे #ब्रह्मास्त्र भाग एक – शिवा 9 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये. या चित्रपटाच्या काही भागाचे शूटिंग बाकी होते, जे नुकतेच पूर्ण झाले आहे.

रणवीर कपूर आणि आलिया भट्टचा हा पहिला चित्रपट आहे. ज्यामध्ये दोघही एकत्र झळकणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर आणि आलिया शिवाय अमिचाभ बच्चन (Amichabh Bachchan) , मौनी राय (Mauni Rai) , नागार्जुन अक्किनेनी (Nagarjuna Akkineni) सारखे दिग्गज कलाकार असतील. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि तमिळ या 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com