Dada Kondke : दादा कोंडकेंचा विक्रम, 9 हिट चित्रपट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

Dada Kondke : दादा कोंडकेंचा विक्रम, 9 हिट चित्रपट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

मराठमोळे अभिनेते दादा कोंडके यांची 8 ऑगस्टला 91 वी जयंती आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मराठमोळे अभिनेते दादा कोंडके यांची 8 ऑगस्टला 91 वी जयंती आहे. सत्तरच्या दशकात विनोदी सिनेमांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मुंबईतील नायगाव येथे ८ ऑगस्ट १९३२ रोजी जन्म झालेल्या कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके यांची आज 91वी जयंती. दादांचा जन्म लालबागचा, गिरणी-कामगाराच्या पोटी. शाळकरी वयातच त्यांना गल्लीतले ‘दादा’ म्हणून ओळखले जात असे.

‘विच्छा माझी पुरी करा’ या नाट्यापासून त्यांचा प्रवास चित्रपटसृष्टीकडे सुरु झाला. अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि इतरही भूमिकांमध्ये दादा कोंडके यांनी काम केलं. त्यांचा ‘पांडू हवलदार’ या चित्रपटदेखिल खूप गाजला. दादा कोंडके हे आपल्या विनोदी भूमिका आणि डबल मिनिंग डायलॉगसाठी आजही ओळखले जातात. 9 हिट चित्रपट देऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद करण्यात आली होती.

दादा कोंडके विनोदी कलाकार होते आणि आपल्या संवादात ते बहुतांशवेळा डबल मिनिंगचा वापर करायचे. त्यांच्या याच शैलीमुळे ते लोकप्रिय झाले. ‘तेरे मेरे बीच मे’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. 50 वर्षे दादा कोंडके हे नाव आजही मराठी सिनेमावर राज्य करत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com