Deepika Padukone-Ranveer Singh : दीपिका - रणवीर होणार आई-बाबा; खास पोस्ट केली शेअर

Deepika Padukone-Ranveer Singh : दीपिका - रणवीर होणार आई-बाबा; खास पोस्ट केली शेअर

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह हे आई-बाबा होणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह हे आई-बाबा होणार आहेत. याची खास पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दिपिकाच्या प्रेग्नसीच्या चर्चा सुरु होत्या. दीपिका आणि रणवीर यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

दीपिका आणि रणवीर यांनी खास पोस्ट शेअर करत 'सप्टेंबर 2024' असं लिहिलं आहे. ही पोस्ट शेअर केल्यानंतर आता कलाकार आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काही दिवसांआधीच एका अवॉर्डला दिपिका उपस्थित राहिली होती. त्यावेळी ती तिचा बेबी बंप लपवताना दिसली असं म्हटलं जात होतं. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com