Relief for Rajpal Yadav
Relief for Rajpal Yadav

Relief for Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादव चेक प्रकरण; दिल्ली उच्च न्यायालयाने शिक्षेला तात्पुरती स्थगिती

राजपाल यादवांना चेक परत येण्याच्या प्रकरणात दिलासा, दिल्ली उच्च न्यायालायने त्यांच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देत १८ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Rajpal Yadav राजपाल यादवांना चेक परत येण्याच्या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. Delhi High Court दिल्ली उच्च न्यायालायने त्यांच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देत १८ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

9 कोटी रुपयांच्या व्यवहारासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना तक्रारदाराच्या खात्यात 1.5 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले. यादव यांनी दुपारी 3 वाजण्यापूर्वीच रक्कम भरल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला.

न्यायालयाने काही अटी घातल्या असून, पुढील सुनावणी 18 मार्च रोजी होणार आहे. त्या दिवशी त्यांना प्रत्यक्ष किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहावे लागेल. दरम्यान, त्यांच्या भाचीचे लग्न 19 फेब्रुवारीला शाहजहांपूर येथे आहे.

माहितीनुसार, चित्रपट निर्मितीसाठी घेतलेले कर्ज वेळेवर फेडता न आल्याने हा वाद निर्माण झाला. याआधीही या प्रकरणात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. आता मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com