जेठालालने तारक मेहता का उल्टा चष्मामधून घेतला ब्रेक! व्हिडिओमधून सांगितले कारण

जेठालालने तारक मेहता का उल्टा चष्मामधून घेतला ब्रेक! व्हिडिओमधून सांगितले कारण

तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या 14 वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात ओळखले जातात.
Published on

तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या 14 वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात ओळखले जातात. अशा परिस्थितीत काही काळ सुद्धा कोणतंही पात्र दिसलं नाही तर चाहत्यांना काळजी वाटते. अशातच, जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामुळे चाहत्यांचे टेन्शन वाढलं आहे. या व्हिडीओमध्ये काही काळ शोमधून ब्रेक घेणार असल्याचे दिलीप जोशी सांगत आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशीने आपल्या कुटुंबासह टांझानियाला ट्रीपला जाण्यासाठी शोमधून थोडा ब्रेक घेतला आहे. सोशल मीडियावर सक्रिय नसतानाही दिलीपने आपल्या पोस्टमध्ये आपल्या ट्रीपचा उल्लेख केला आहे. यादरम्यान, जेठालालचे पात्र काही दिवस शोमधून गायब राहू शकते. तारक मेहता का उल्टा चष्माच्या व्यस्त शेड्युलमध्ये कलाकारांना फारसा ब्रेक मिळत नाही आणि यावेळी जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांनी त्यांच्या शेड्युलमधून इतका छोटा ब्रेक घेतला आहे.

दरम्यान, तारक मेहता का उल्टा चष्मा सिरिअलमध्ये गोकुळधामच्या लोकांनी गणेश चतुर्थी साजरी केली आणि बाप्पाचे स्वागत केले. यावेळी जेठालालने आपण गणेशोत्सवात सहभागी होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट केले. बाप्पाचे स्वागत करून पहिली आरती केल्यानंतर ते इंदूरला रवाना होतील. हे दृश्य जेठालाल शूटिंगमधून ब्रेक घेत असल्याने काही दिवसांसाठी शोमधून बाहेर जाण्याचे संकेत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com