मनोरंजन
Dharmendra Health Update : अभिनेता धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी दिली 'ही' मोठी माहिती
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते.
(Dharmendra Health Update ) ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देओल कुटुंबीयांकडून त्यांच्या प्रकृतीचे माहिती सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अभिनेता धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
धर्मेंद्रजी यांना आज सकाळी साडेसात वाजता ब्रिज कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांचे उपचार आता घरीच सुरू राहतील, अशी ब्रिज कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समाधानी यांनी माहिती दिली आहे.
