Rakhi Sawant : माझ्याशी पंगा घेऊ नका…,राखी सावंत म्हणाली डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील...

Rakhi Sawant : माझ्याशी पंगा घेऊ नका…,राखी सावंत म्हणाली डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील...

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात राखी सावंत मोठा दावा करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये ती डोनाल्ड ट्रंप यांना आपले खरे वडील असल्याचे सांगत आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • राखी सावंत नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत

  • राखी सावंत म्हणाली डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील

  • काहींना राखीच्या वक्तव्यामुळे धक्का बसला असल्याचेही दिसत आहे

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात राखी सावंत मोठा दावा करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये ती डोनाल्ड ट्रंप यांना आपले खरे वडील असल्याचे सांगत आहे.

माझ्याशी पंगा घेऊ नका…

या वेळी राखी सावंत (Rakhi Sawant) एका इव्हेंटमध्ये ब्लॅक रंगाच्या कपड्यात दिसत होती. मीडिया प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले, माझी आई आता या जगात नाही. माझ्या आईने एक चिठ्ठी सोडली होती, ज्यात लिहून ठेवलं होतं की, माझे खरे वडील डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) आहेत. राखीला (Bollywood) त्यावेळी एका प्रश्न विचारण्यात आला की, पण सध्या ट्रंप मोदींना खूप त्रास देत आहेत. या प्रश्नावर राखी सावंत पूर्णपणे दुर्लक्ष करत म्हणाली, ‘थँक यू सो मच, माझ्याशी पंगा घेऊ नका.’

व्हिडिओ सोशल मीडियावर

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगात पसरतोय असून अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही यूजर्सने हास्यात्मक टिप्पणी केली आहे. याशिवाय लक्षात घेण्यासारखे आहे की राखी सावंतने इस्लाम धर्मात विवाह केल्यानंतर अनेकदा उमराहसुद्धा केला आहे. अलीकडेच त्यांच्या एका व्हिडिओमध्ये काबा इथे तिची उपस्थिती दिसून आली होती.

चाहत्यांचे लक्ष पुन्हा एकदा

राखी सावंतच्या या वादग्रस्त वक्तव्यासोबतच सोशल मीडियावर ती पुन्हा चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. तिच्या विधानामुळे चाहत्यांमध्ये हळूहळू हसत-खेळत चर्चा रंगली आहे, तर काहींना राखीच्या वक्तव्यामुळे धक्का बसला असल्याचेही दिसत आहे. विशेष म्हणजे, राखी सावंतचे अशा प्रकारचे वक्तव्य नेहमीच मीडिया आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असते, त्यामुळे चाहत्यांचे लक्ष पुन्हा एकदा त्यांच्या वर्तनाकडे गेले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com