De Dhakka 2
De Dhakka 2Team Lokshahi

De Dhakka 2 : थांबायचं नाय गड्या, घाबरायचं नाय; 'दे धक्का 2’ चा टीझर रिलीज

‘दे धक्का 2’ या चित्रपटाचा हटके टीझर काल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Published by :
shamal ghanekar

‘दे धक्का 2’ (de dhakka 2) या चित्रपटाचा हटके टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का 2’ हा चित्रपट 5 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. ‘दे धक्का 2’ चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांची आता हा चित्रपट पाहण्याची आतुरता वाढली आहे. यावेळी ‘दे धक्का 2’ चित्रपटामध्ये सर्वचं कलाकारांचा मॉर्डन अवतार पाहायला मिळणार आहे.

De Dhakka 2
मकरंद माने दिग्दर्शित ‘सोयरीक’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस

या चित्रपटाचे पोस्टर पाहूनचं प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. तसेच ‘दे धक्का 2’ या चित्रपटामध्ये मुंबई-कोल्हापूर ट्रीप नाही तर थेट लंडन ट्रीप असणार आहे. पोस्टरमध्ये लंडनमधील धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 2008मध्ये ‘दे धक्का’ हा चित्रपट हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. ‘दे धक्का’मध्ये शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर मुख्य भूमिकेत होते.

De Dhakka 2
महेश मांजरेकरांकडून महाराष्ट्र दिनी नव्या चित्रपटाची घोषणा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com