Dunki First Song Out
Dunki First Song Out Team Lokshahi

Dunki First Song Out : 'डंकी'चे पहिले गाणे 'लुट पुट गया' रिलीज

'डंकी'चे पहिले गाणे 'लुट पुट गया' रिलीज झाले.

'डंकी'चे पहिले गाणे 'लुट पुट गया' रिलीज झाले.

2 नोव्हेंबरला शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त 'डिंकी'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला. हा टीझर पाहून शाहरूखच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली होती. अशामध्ये आता निर्मात्यांनी 'डंकी'चे पहिले गाणं 'लुट पुट गया' रिलीज केले आहे. या गाण्यामध्ये शाहरुख खान तापसी पन्नूसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हा एक रोमँटिक ट्रॅक आहे. या गाण्यात शाहरुख खान तापसी पन्नू दोघांचीही केमिस्ट्री खूपच सुंदर दिसत आहे. या गाण्याला अवघ्या काही मिनिटांमध्येच प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

या गाण्यात अरिजित सिंगचा हृदयस्पर्शी आवाज आहे, तर या गाण्याचे म्युजिक डायरेक्टर प्रितम आहे. गाण्याचे बोल स्वानंद किरकिरे आणि आयपी सिंग यांनी लिहिले आहेत. गाण्यातील सुपर डान्स मूव्ह्स गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केले आहेत. या गाण्यामध्ये शाहरुख खान जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. शाहरुखने या डान्सच्या माध्यमातूनच पुन्हा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

चित्रपटाचा टीझर अप्रतिम आहे

अलीकडेच, निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला ड्रॉप प्रदर्शित केला, ज्याला प्रेक्षकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. इंग्लंडला जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चार मित्रांची कथा या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. त्याच्या सर्व मित्रांची जबाबदारी हार्डीच्या म्हणजेच शाहरुख खानच्या खांद्यावर आहे. शाहरुख खानचा डिंकी हा त्याच्या 'जवान' आणि 'पठाण' या चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे.

राजकुमार हिरानी यांनी कधीही फ्लॉप चित्रपट दिले नाहीत

या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी एकही फ्लॉप चित्रपट दिग्दर्शित केलेला नाही. अशा परिस्थितीत चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात शाहरुख शिवाय तापसी पन्नू आणि विकी कौशल हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ख्रिसमसच्या खास मुहूर्तावर म्हणजेच 21 डिसेंबरला 'डिंकी' चित्रपट रिलीज होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com