शाहरुख खानच्या बंगल्याला एअरपोर्टसारखी सिक्युरिटी! 'या' अभिनेत्याचा खुलासा

शाहरुख खानच्या बंगल्याला एअरपोर्टसारखी सिक्युरिटी! 'या' अभिनेत्याचा खुलासा

‘डंकी’ चित्रपटात शाहरुख खानसोबत भूमिका साकारलेला अभिनेता विक्रम कोच्चरने ‘मन्नत’ बंगल्याला भेट दिली. एका मुलाखतीत विक्रमने ‘मन्नत’ बंगल्याबद्दल खुलासा केला आहे.
Published by :
Team Lokshahi

अभिनेता शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'डंकी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘डंकी’ चित्रपटात शाहरुख खानसोबत भूमिका साकारलेला अभिनेता विक्रम कोच्चरने ‘मन्नत’ बंगल्याला भेट दिली.

एका मुलाखतीत विक्रमने ‘मन्नत’ बंगल्याबद्दल खुलासा करत म्हणाला, 'जेव्हा आम्ही शाहरुख खानला पहिल्यांदा भेटणार होतो, तेव्हा त्याने आम्हाला त्याच्या मन्नत बंगल्यावर बोलावलं होतं. त्याचं घर खूपच सुंदर आहे आणि आम्ही लिफ्टमधून गेलो होतो. घरात एण्ट्री करण्यापूर्वी सुरक्षेसाठी भरपूर तपासणी झाली होती. मोठी भिंत, त्यानंतर मोठा प्रवेशद्वार, लॉबी आणि एअरपोर्टवर जाण्यापूर्वी ज्याप्रकारची चेकिंग होते, अगदी त्याचप्रकारची चेकींग तिथे होते. इथे प्रत्येक गोष्ट स्कॅन केली जाते'.

पुढे विक्रम म्हणाला, 'जेव्हा आम्ही त्याच्या रुममध्ये गेलो, तेव्हा शाहरुख झोपेतून उठला होता. तो आमच्याशी खूप विनम्रतेने वागला. तो प्रत्येक व्यक्तीशी तितक्याच नम्रतेने वागतो. तो त्याने आम्हा सर्वांची योग्यरित्या काळजी घेतली. शाहरुखमध्ये एक असा खास गुण आहे, ज्यामुळे त्याच्या आजूबाजूला असलेले लोक खूप कम्फर्टेबल होतात. तो खूप मोठा स्टार आहे, असं भासवत नाही. तुम्ही एखादी गोष्ट सुचवली, तर तो ऐकतो आणि चर्चा करण्यासही तयार असतो. शूटिंगदरम्यान अनेकदा तो सहकलाकारांचं ऐकतो आणि त्यानुसार करतो'.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ या चित्रपटात शाहरुखसोबतच तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन इराणी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com