Shefali Jariwala Passed Away : 'काटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन ; मनोरंजन क्षेत्रावर शोककळा

Shefali Jariwala Passed Away : 'काटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन ; मनोरंजन क्षेत्रावर शोककळा

शेफाली जरीवालाच्या आकस्मिक निधनाने मनोरंजन क्षेत्रात शोककळा
Published by :
Shamal Sawant
Published on

'काटा लगा' या गाण्याने प्रसिद्ध झालेल्या शेफाली जरीवाला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 42 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी लोखंडवाला परिसरात राहणारी अभिनेत्री शेफाली रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गंभीर आजारी पडली. छातीत दुखू लागल्याने, तिचा पती पराग त्यागी तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला, जिथे तिला पोहोचताच मृत घोषित करण्यात आले. सध्या तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

ज्येष्ठ चित्रपट समीक्षक विकी लालवानी यांच्या इन्स्टाग्राम पेजने शेफाली जरीवालाच्या मृत्यूची पुष्टी केली आणि म्हटले की शेफालीच्या पतीने तिला अंधेरीतील बेलेव्ह्यू रुग्णालयात आणले. परंतु डॉक्टर तिच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वीच शेफालीचा मृत्यू झाला. या संदर्भात त्यांनी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. विजय लुल्ला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

नंतर, रुग्णालयातील दुसऱ्या डॉक्टर सुशांत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. शेफाली जरीवालाच्या प्रकृतीबद्दल अशी कोणतीही बातमी नाही. आतापर्यंत मिळालेल्या अपडेट्सनुसार, शेफालीने 3 दिवसांपूर्वी एक फोटोशूट देखील केले होते.

शेफाली जरीवालचे करिअर :

शेफाली जरीवाला तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होती. तिचा जन्म अहमदाबादमध्ये झाला. 2002 मध्ये तिने आशा पारेख यांच्या चित्रपटातील 'कांता लगा' या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ रिक्रिएट केला. जेव्हा हे गाणे रिलीज झाले तेव्हा त्याला खूप लोकप्रियता मिळाली आणि त्याला विरोधही झाला. शेफालीचा हा व्हिडिओ इतका हिट झाला की तिला स्वतःला 'कांता लगा गर्ल' म्हटले जाऊ लागले. तिने सलमान खानच्या लोकप्रिय शो 'बिग बॉस 13' मध्येही दिसून आली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com