Chhaava Movie : 'छावा' चित्रपटाची पंतप्रधानांही भुरळ, संसदभवनात स्पेशल स्क्रिनींग

Chhaava Movie : 'छावा' चित्रपटाची पंतप्रधानांही भुरळ, संसदभवनात स्पेशल स्क्रिनींग

'छावा' चित्रपटाची संसद भवनात स्पेशल स्क्रिनींग; पंतप्रधान मोदींसह अनेक मंत्री आणि खासदार उपस्थित राहणार.
Published by :
Team Lokshahi
Published on

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात ते पाहणार असल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संसदेत होणाऱ्या या विशेष स्क्रिनिंगला अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. हे स्क्रिनिंग संसद भवन ग्रंथालयाच्या बालयोगी सभागृहात होणार आहे.

'छावा' चित्रपटाचे संपूर्ण कलाकार आणि टीम गुरुवार 27 रोजी संसदेत होणाऱ्या विशेष प्रदर्शादरम्यान उपस्थित राहतील. या चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल देखील उपस्थित राहणार आहे. मुघल शासक औरंगजेब विरुद्ध संभाजी महाराजांचे धाडस आणि संघर्ष दाखवण्यासाठी बनलेल्या चित्रपटाचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केल्यानंतर एका महिन्यानंतर, हा चितिरपट आता संसद भवनात प्रदर्शित होत आहे.

यापुर्वी संसद भवनात गुजरात दंगलींवर आधारित 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदार उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com