चाहत्यांनी चक्क थिएटर्समध्येच फोडले फटाके…सलमान खान संतापला

चाहत्यांनी चक्क थिएटर्समध्येच फोडले फटाके…सलमान खान संतापला

Published by :

सलमान खानचा "अंतिम" सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. अशाच काही उत्सुक चाहत्यांनी थेट थिएटर्समध्येच फटाके फोडल्याची घटना घडली. विशेष म्हणजे यावेळी थिएटर्स संपुर्ण भरगच्च भरले आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. या संदर्भातला व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करत सलमान खानने असा प्रकार कोणी करू नये, असे आवाहन केले.

सलमान खान याचा अंतिम सिनेमा 26 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. हा सेनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सलमान खानच्या चाहत्यांनी, सिनेमा सुरू असताना फटाके लावले. या संदर्भात सलमान खान याने त्याच्या इंस्टाग्रामवर ही व्हिडीओ पोस्ट करून सांगितल कि " माझ्या सर्व चाहत्यांना विनंती आहे की, फटाके सभागृहात नेऊ नयेत कारण ते आगीचा मोठा धोका आहे ज्यामुळे तुमचा आणि इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो." असं पोस्ट करून आपल्या चाहत्यांना आवाहन केले.

दरम्यान "माझी थिएटर मालकांना विनंती आहे की, फटाके सिनेमागृहात नेण्यास परवानगी देऊ नये आणि एंट्री पॉईंटवर सुरक्षेने त्यांना असे करण्यापासून रोखावे. चित्रपटाचा सर्वत्र आनंद घ्या ही माझी सर्व चाहत्यांना विनंती आहे." असे सलमान खान यांनी सांगितलं आहे.

अनेकांना व्हिडीओ बघून असा प्रश्न पडला आहे कि चित्रपट गृहात फटाके घेवून जाण्यास परवानगी दिली तरी कशी. सिनेमा गृहात पहिल्यांदाच असा प्रकार पाहायला मिळाला असता, हे दृश्य सर्वाना हादरवून देणार आहे. हा व्हिडीओ आता सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com