Filmfare 2024: मुंबईत दरवर्षी होणारा फिल्मफेअरही आता होणार गुजरातमध्ये

Filmfare 2024: मुंबईत दरवर्षी होणारा फिल्मफेअरही आता होणार गुजरातमध्ये

मुंबईतला मानाचा फिल्मफेअरही आता गुजरातला होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबईतला मानाचा फिल्मफेअरही आता गुजरातला होणार आहे. २७ आणि २८ जानेवारीला हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. 'यंदा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा हा दोन दिवस म्हणजे २७ आणि २८ जानेवारी रोजी पार पडणार आहे.

या पुरस्कार सोहळ्याची घोषण करताना करण जोहर, अभिनेता वरुण धवन, अभिनेत्री जान्हवी कपूर, 'फिल्मफेअर'चे संपादक जितेश पिल्लई, 'टाइम्स एंटरटेनमेंट डिव्हिजन'चे संचालक रोहित गोपकुमार आणि गुजरात पर्यटन विभागाचे प्रधान सचिव हरित शुक्ला उपस्थित होते.

२०१८ ते २०२३ पर्यंत फिल्मफेअर पुरस्कार हा मुंबईमध्ये आयोजित करण्यात येत होता. २०२०मध्ये फक्त हा सोहळा गुवाहाटी येथे झाला होता. त्यानंतर आता फिल्मफेअर सोहळा गुजरातला होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com